बासेल (स्वित्झर्लंड) - आजपासून जागतिक बॅडमिंटन स्पर्धेला सुरुवात होणार आहे. पी. व्ही. सिंधूला दोनवेळा अंजिक्यपदकाने हुलकावणी दिली असून यंदा दिमाखदार कामगिरी करत अंजिक्यपद पटकावण्याचा निर्धार सिंधूने केला आहे. स्पर्धेत चांगली कामगिरी व्हावी, यासाठी ती आपल्या खेळावर लक्ष केंद्रीत करत आहे.
पी. व्ही. सिंधूने मागील वर्षी या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तिने या स्पर्धेत एकूण दोन सलग रौप्य पदके आणि २ कांस्य पदके जिंकली आहेत. मात्र, तिला अद्याप सुवर्णपदक जिंकता आले नाही. सिंधूला २०१७ मध्ये ११० मिनिटे चाललेल्या सामन्यात जपानच्या नाओमी ओकुहाराकडून, तर २०१८ मध्ये स्पेनच्या कॅरोलिना मारिनकडून अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागला होता.
मागील महिन्यात सिंधूने इंडोनेशिया ओपन स्पर्धेचे उपविजेतेपद पटकावले आहे. सद्या ती आपल्या बचाव व तंदूरुस्तीवर मेहनत घेत आहे. स्पर्धेत सिंधूला पहिल्या फेरीत चाल मिळाली असून ती सरळ दुसऱ्या फेरीतील सामना खेळणार आहे. तर, भारताच्या सायना नेहवालसाठी ही स्पर्धा खडतर ठरणार आहे. सायनाला पहिल्या फेरीत चाल मिळाली असून ती दुसऱ्या फेरीत खेळेल. सायनाने या स्पर्धेत एक रौप्य आणि एक कांस्य पदक जिंकले आहे.
पुरुष एकेरीत किदाम्बी श्रीकांत दुखापतीनंतर स्पर्धेत सहभागी होईल. त्याने मार्चमध्ये इंडिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत अंतिम फेरी गाठली होती. तो सलामीला आयर्लंडच्या नाट एनगुयेनविरुद्ध खेळेल. तर समीर वर्मा सिंगापूरच्या लोह कीन येवशी विरुद्ध लढेल. तर एचएस प्रणॉयचा सलामीचा सामना फिनलँडच्या ईटू हेयनोशी यांच्यी होणार आहे.