नवी दिल्ली -बॅडमिंटन खेळामधील उत्सुकता टिकून राहावी. तसेच या खेळाकडे नवोदित खेळाडू, देशातील युवा पिढीही खेचली जावी, यासाठी जागतिक बॅडमिंटन महासंघ (बीडब्ल्यूएफ) नियमावलीत बदल करणार आहे. इंडोनेशिया आणि मालदीव या दोन संघटनांनी केलेल्या शिफारशीनुसार, आता नियमात बदल केले जाण्याची शक्यता आहे.
बॅडमिंटनमध्ये सध्या २१ गुणांचे तीन गेम होतात. यातील दोन गेम जिंकणारा खेळाडू विजेता ठरतो. आता गेममध्ये बदल करण्यात येणार असून ११ गुणांचे पाच गेम होणार असल्याची शक्यता महासंघाने व्यक्त केली आहे.