नवी दिल्ली -जागतिक बॅडमिंटन फेडरेशनने (बीडब्ल्यूएफ) थॉमस अँड उबर चषक स्थगित करण्याची घोषणा केली आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या या स्पर्धेतून अनेक देशांनी माघार घेतली. थॉमस अँड उबर चषक पुढील महिन्यात ३ ते ११ ऑक्टोबर दरम्यान डेन्मार्कमध्ये होणार होता. या स्पर्धेपासून आघाडीच्या बॅडमिंटन स्पर्धांना प्रारंभ केला जाणार होता.
"जागतिक बॅडमिंटन फेडरेशन थॉमस आणि उबेर चषक २०२० यजमान बॅडमिंटन डेन्मार्कच्या संमतीने पुढे ढकलण्याचा निर्णय घेत आहे. अनेक स्पर्धक संघांनी नावे मागे घेतल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे", असे बीडब्ल्यूएफने सांगितले.