हैदराबाद - कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर वर्ल्ड बॅडमिंटन फेडरेशनने (बीडब्ल्यूएफ) गुरुवारी 11 ते 16 ऑगस्ट दरम्यान होणारी हैदराबाद ओपन बॅडमिंटन स्पर्धा रद्द केली आहे. ही स्पर्धा बीडब्ल्यूएफच्या सुधारित वेळापत्रकाचा एक भाग होती.
"काही देशांमध्ये परिस्थिती बदलत आहे. त्यामुळे बीडब्ल्यूएफ स्पर्धेची आवश्यकता असताना माहिती देईल," असे महासचिव थॉमस लँड यांनी फेडरेशनच्या अधिकृत वेबसाइटवर म्हटले.
“आज नमूद केलेले बदल आवश्यक होते. परंतु बॅडमिंटनच्या पुनरागमनाची दखल घेऊन तयार करण्यात आलेल्या बीडब्ल्यूएफच्या नव्या वेळापत्रकावर थेट परिणाम होणार नाही,” असेही ते म्हणाले.
हैदराबाद ओपनशिवाय ऑस्ट्रेलियन ओपन, कोरिया मास्टर्स स्पर्धाही रद्द करण्यात आली आहे. त्याचबरोबर जर्मन ओपन, स्विस ओपन आणि युरोपियन मास्टर्सला तहकूब करण्यात आले असून येत्या काळात या स्पर्धांवर निर्णय घेणार असल्याचे बीडब्ल्यूएफने म्हटले आहे.