नवी दिल्ली - जागतिक बॅडमिंटनस स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकणारी भारताची स्टार महिला खेळाडू पी. व्ही. सिंधू भारतात परतली असून तिचे दिल्ली विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी सिंधूसोबत तिचे प्रशिक्षक पुलेला गोपीचंदही होते. त्यांनी क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांची भेट घेतली.
'सुवर्ण'सिंधूने घेतली क्रीडा मंत्री किरन रिजिजू यांची भेट - क्रीडा मंत्री किरन रिजिजू
पी. व्ही. सिंधू आणि मुख्य प्रशिक्षक गोपीचंद यांनी क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान, रिजिजू यांनी सिंधूला १० लाखांचा धनादेश बक्षिस म्हणून दिला. याप्रसंगी बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष हिमंता बिस्वा शर्मा, आणि किम जी-ह्यून, सिंधूचे वडील पी. व्ही. रमण हेही उपस्थित होते.
रिजजू यांना भेटण्यापूर्वी गोपीचंद यांनी माध्यंमाशी बातचित केली. यावेळी बोलताने ते म्हणाले की, 'सिंधूच्या कामगिरीचा आनंद असून तिने यापूर्वी रौप्य आणि कांस्य पदक जिंकली आहेत. मात्र, यंदा तिने सुवर्णपदक जिंकत टीका करणाऱ्यांना प्रत्त्युत्तर दिले आहे.'
पुढे बोलताना गोपीचंद म्हणाले, जेव्हा तुम्ही आतंरराष्ट्रीय स्तरावर खेळत असता, तेव्हा तुमचे प्रदर्शन हे चांगले असायलाच हवे. वेळोवेळी आपल्याला आपल्या खेळातील प्रदर्शन सुधरवावे लागले. असंही त्यांनी सांगितलं.