लंडन - कोरोनाच्या धास्तीमुळे यंदाची ऑलिम्पिक स्पर्धा पुढच्या वर्षी पार पडणार आहे. त्यामुळे २०२१ मध्ये होणाऱ्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेचे वेळापत्रकही नव्याने तयार होणार आहे. बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने याची माहिती दिली.
जागतिक बॅडमिंटन स्पर्धेचे वेळापत्रक नव्याने होणार तयार
बीडब्ल्यूएफच्या म्हणण्यानुसार, स्पेनच्या व्हेलवा येथे होणाऱ्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या नवीन तारखांची चर्चा सुरू करण्यात आली आहे. ही स्पर्धा २०२१ मध्ये होईल का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
जागतिक बॅडमिंटन स्पर्धेचे वेळापत्रक नव्याने होणार तयार
बीडब्ल्यूएफच्या म्हणण्यानुसार, स्पेनच्या व्हेलवा येथे होणाऱ्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या नवीन तारखांची चर्चा सुरू करण्यात आली आहे. ही स्पर्धा २०२१ मध्ये होईल का हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
बॅडमिंटनमधील महत्त्वाची मानली जाणारी ही स्पर्धा ऑगस्टमध्ये होते, आणि याच काळात ऑलिम्पिकचे आयोजनही होणार आहे. त्यामुळे ही स्पर्धा २०२२ मध्ये खेळवण्यात येऊ शकते.