नवी दिल्ली - भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने नुकत्याच पार पडलेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकावली. या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिलीच भारतीय खेळाडू ठरली. सुवर्णपदकासह मायदेशात परतलेल्या सिंधूची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेट घेतली. या भेटीदरम्यान, 'सिंधू तू भारताची शान आहेस', असे गौरोद्गार त्यांनी उच्चारले.
'सिंधू तू भारताची शान', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उधळली स्तुतीसुमने - मोदींनी घेतली सिंधूची भेट
भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने नुकत्याच पार पडलेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकावली. या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिलीच भारतीय खेळाडू ठरली. सुवर्णपदकासह मायदेशात परतलेल्या सिंधूची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेट घेतली. या भेटीदरम्यान, 'सिंधू तू भारताची शान आहेस', असे गौरोद्गार त्यांनी उच्चारले.
'सिंधू तू भारताची शान', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उधळली स्तुतीसुमने
पी. व्ही सिंधूची भेट घेतल्यानंतर मोदी म्हणाले की, भारताची शान, सबंध भारताला सुवर्णक्षणाचा साक्षीदार बनवणाऱ्या पी. व्ही. सिंधूला भेटून आनंद झाला. तिचे मनापासून अभिनंदन आणि त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.'
दरम्यान, सिंधूला २०१७ व २०१८ मध्ये अंतिम फेरीत धडक मारुनही विजेतेपदाने मिळवता आले नव्हते. मात्र, यंदा सिंधूने उत्तुंग कामगिरी करत सुवर्णपदक जिंकले. तिने अंतिम सामन्यात अवघ्या ३६ मिनिटांमध्ये जपानच्या नोओमी ओकुहाराचा २१-७,२१-७ असा पराभव केला.