नवी दिल्ली - बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन (बीडब्ल्यूएफ) ने कॅनडा ओपन व यूएस ओपन सुपर 300 टुर्नामेंट रद्द केल्या आहेत. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता बीडब्ल्यूएफने हा निर्णय घेतला आहे.
यूएस ओपनचे आयोजन या वर्षी 6 ते 11 जुलै या कालावधीत होणार होते. तर कॅनडा ओपन 29 जून ते 4 जुलै या कालावधीत होणार होती. पण कोरोनामुळे या स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. इतकेच नव्हे तर बॅडमिंटन आशियाई चॅम्पियनशीप स्पर्धाही स्थगित करण्यात आली आहे.