नवी दिल्ली - इंडिया ओपनचे आयोजन डिसेंबर किंवा पुढच्या वर्षी जानेवारीत होऊ शकते, असे बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाने (बीएआय) म्हटले आहे. कोरोनावर नियंत्रण आल्यास आणि शासनाने मान्यता दिल्यास ही स्पर्धा होण्याची शक्यता बीएफआयने वर्तवली आहे.
ही ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा यापूर्वी मार्चमध्ये खेळली जाणार होती. मात्र ती पुढे ढकलण्यात आली. वर्ल्ड बॅडमिंटन फेडरेशनने भारतीय संघटनेला स्पर्धा होण्याच्या संभाव्य कालावधीबद्दल विचारले होते.