बर्मिंगहॅम -अश्विनी पोनप्पा आणि एन. सिक्की रेड्डी या भारतीय महिला दुहेरीच्या जोडीला ऑल इंग्लंड ओपन स्पर्धेतून बाहेर पडावे लागले आहे. जपानच्या मिसाकी मात्सुतोमो आणि अयाका तकाहाशीने पोनप्पा-रेड्डीला १३-२१, १४-२१ अशी मात दिली.
हेही वाचा -आता आयपीएल 'या' तारखेपासून, बीसीसीआयचा मोठा निर्णय
मिसाकी मात्सुतोमो आणि अयाका तकाहाशीने पोनप्पा-रेड्डीला आत्तापर्यंत आठ वेळा पराभूत केले आहे. हा सामना ३८ मिनिटे रंगला होता. आता या स्पर्धेत भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधुचे आव्हान कायम आहे. उपांत्यपूर्व फेरीत सिंधु जपानच्या नोजोमी ओकुहाराशी टक्कर घेईल.
लक्ष्य सेन बाहेर -
भारताचा युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन ऑल इंग्लंड ओपन स्पर्धेतून बाहेर पडला आहे. पुरुष एकेरीच्या दुसर्या फेरीत पराभूत झाल्यानंतर लक्ष्यचे आव्हान संपुष्टात आले आहे. डेन्मार्कच्या विक्टर एक्सेलसेनने लक्ष्यला २१-१८, २१-१८ असे पराभूत केले.