भुवनेश्वर(ओडिशा) - भारतीय पॅरा स्पोर्ट्स बॅडमिंटन खेळाडू प्रमोद भगत यांची अर्जुन पुरस्कारासाठी निवड झाली आहे. प्रमोद हे ओडिशा राज्यातील बरगड जिह्यातील रहिवाशी असून त्यांना वयाच्या ७ व्या वर्षी पोलिओ झाला. पुरस्कारासाठी निवड झाल्यानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया 'ईटीव्ही भारत'ला व्हिडिओच्या माध्यमातून दिली.
EXCLUSIVE VIDEO : अर्जुन पुरस्कारासाठी निवड झाल्यानंतर पॅरा बॅडमिंटनपटू प्रमोद भगत यांची प्रतिक्रिया - arjuna award pramod bhagat
भगत म्हणाले, 'अर्जून पुरस्कार मिळणे माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. मात्र, मी हा आनंद सध्या सेलिब्रेट करू शकत नाही. काही दिवसात पॅरा ऑलिम्पिकची निवड सुरू होणार आहे. यामुळे मी या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करत आहे.'

मी कुटुंबीय, प्रशिक्षक गौरव खन्ना, दास सर, यांच्यासह माझ्यावर प्रेम करणारे चाहते तसेच गावकऱ्यांचे आभार मानतो, असेही भगत म्हणाले. इंडोनेशियातील जकार्ता येथे झालेल्या पॅरा आशियाई खेळांमध्ये प्रमोद भगत यांनी बॅडमिंटन एकेरी प्रकारात इंडोनेशियाच्या उकुन रुकेंडीचा पराभव करत सुवर्णपदक पटकावले होते.