बर्मिंगहॅम - भारताची फुलराणी सायना नेहवालने ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. सायनाने बुधवारी झालेल्या दुसऱ्या फेरीतील सामन्यात डेन्मार्कच्या लिने होजमार्क क्लाएर्सफेल्टचा पराभव केला
All England Championships: सायनाची उपांत्यपूर्व फेरीत धडक - through
सायना नेहवालचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश
सायना नेहवाल
सायनाने या सामन्यात होजमार्कला ८-२१, २१-१६, २१-१३ ने हरवले. हा सामना ५० मिनिटांपर्यंत चालला. पहिल्या फेरीतील सामन्यात सायनाने स्कॉटलंडच्या गिल्मोराला २१-१७, २१-१८ ने पराभूत केले होते.
या स्पर्धेत पहिल्या दिवशी झालेल्या पहिल्या फेरीच्या सामन्यात पी. व्ही. सिंधूला पराभवाचा धक्का बसला होता. दक्षिण कोरियाच्या सुंग जी ह्य़ुंगने सिंधूला २१-१६ , २०-२२, २१ -१८ ने पराभवाचा धक्का दिला होता. या पराभवामुळे सिंधूचे स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात आले होते.