नवी दिल्ली - तैवान संघासह सराव करणार्या कनिष्ठ खेळाडूला कोरोना व्हायरसची लागण झाल्याने सायना नेहवालसह इतर भारतीय बॅडमिंटनपटूंनी चिंता व्यक्त केली आहे. गेल्या आठवड्यात बर्मिंगहॅम येथे झालेल्या ऑल इंग्लंड ओपन स्पर्धेत हा खेळाडू उपस्थित होता. या स्पर्धेत सायना, पी.व्ही. सिंधू, किदांबी श्रीकांत यांच्या व्यतिरिक्त भारतातील अनेक अव्वल क्रमांकाच्या खेळाडूंनी भाग घेतला होता.
कोरोनामुळे भारतीय बॅडमिंटनपटू चिंतेत!
गेल्या आठवड्यात बर्मिंगहॅम येथे झालेल्या ऑल इंग्लंड ओपन स्पर्धेत कोरोना व्हायरसची लागण झालेला खेळाडू उपस्थित होता. एका वृत्तपत्राच्या अहवालानुसार, या खेळाडूने हॉटेलपासून ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपच्या अरेना पर्यंत भारतीय खेळाडूंसोबत तैवानच्या टीम बसमध्ये प्रवास केला.
कोरोनामुळे भारतीय बॅडमिंटनपटू चिंतेत!
हेही वाचा -पाकिस्तानी क्रिकेटपटूवर आजीवन बंदीची कारवाई?
एका वृत्तपत्राच्या अहवालानुसार, या खेळाडूने हॉटेलपासून ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपच्या अरेना पर्यंत तैवानच्या टीम बसमध्ये प्रवास केला. ११ ते १५ मार्च दरम्यान ही स्पर्धा पार पडली. ही माहिती उघडकीस आल्यापासून सायनासह अनेक भारतीय खेळाडू चिंतेत सापडले आहेत. दोन दिवसांपूर्वी ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यासंबंधी सायनाने क्रीडा प्रशासकांना धारेवर धरले होते.
Last Updated : Mar 21, 2020, 12:37 PM IST