हेलसिंकी - फिनलॅँड येथे झालेल्या ३८ व्या जीबी बॉक्सिंग स्पर्धेत भारतीय बॉक्सर कविंदर सिंगने ५६ किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावले आहे. कविंदरने आपलाच देशवासी असलेला राष्ट्रकुल स्पर्धेतील कांस्य पदक विजेता मोहम्मद हुसामुद्दीनचा ५-० ने पराभव करत हे सुवर्ण यश मिळवले.
जीबी बॉक्सिंग स्पर्धेत भारतीय बॉक्सर कविंदर सिंगला सुवर्ण पदक - gold
५६ किलो वजनी गटात सुवर्ण पदक
kavinder singh
या बॉक्सिंग स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी एकूण 8 पदके मिळवली आहेत. त्यात १ सुवर्ण आणि ४ रोप्य आणि ३ कांस्य पदकांचा समावेश आहे. भारताकडून विजेता थापा (६० किलो ) युवा गोविंद साहनी (४९ किलो ) मोहम्मद हुसामुद्दीन (५६ किलो) आणि दिनेश डागर (६९ किलो ) यांनी रोप्य पदके पटकावलील.
कविंदर सिंग आणि मोहम्मद हुसामुद्दीन हे दोन्ही बॉक्सर सेना क्रीडा नियंत्रण बोर्डाचे खेळाडू असल्याने दोघांनाही एकमेकांची खेळण्याची पद्धत माही होती.