मुंबई- आजपासून पहिली आंतरराष्ट्रीय मल्लखांब विश्वचषक स्पर्धा दादर शिवाजी पार्क येथे सुरू झाली आहे. सकाळपर्यंत जगातील १४ देशांचे संघ जागतिक मल्लखांब स्पर्धेसाठी मुंबईत दाखल झाले आहेत. शुक्रवारी सकाळी आणि सायंकाळच्या सराव सत्रात भाग घेतला.
स्पर्धेसाठी दाखल झालेल्या पंचांसाठी विशेष मार्गदर्शन सत्रे आयोजित करून त्यांना स्पर्धेसाठी बनवण्यात आलेल्या नव्या नियमावलीची माहिती देण्यात आली. प्रत्येक सत्रात ७ पंचांची समिती कामकाज पाहत असून प्रत्येकाकडे त्यातील विभिन्न जबाबदारी सोपवण्यात आली आहे.