महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'झिंग झिंग झिंगाट'चा सेलिब्रिटी स्पेशल एपिसोड, हे कलाकार लावणार हजेरी - zing zing zingat

आपल्या लाडक्या कलाकारांमध्ये रंगणारी गाण्याची मैफिल प्रेक्षक संध्याकाळी अनुभवू शकतील. आता हे सगळे कलाकार एकाच मंचावर आल्यावर गाण्यांसोबत धमाल मजा मस्ती तर होणारच यात शंका नाही

'झिंग झिंग झिंगाट'चा सेलिब्रिटी स्पेशल एपिसोड

By

Published : Apr 21, 2019, 11:35 AM IST

मुंबई- आपल्या धकाधकीच्या जीवनात एक तास विरंगुळ्याचे क्षण देणारा कार्यक्रम म्हणजे 'झिंग झिंग झिंगाट'. या कार्यक्रमात फक्त सुरांची मैफिलच रंगत नाही तर रक्ताची नाती नसलेली कुटुंबंही भेटतात आणि एक तास रंगते गाण्यांची जुगलबंदी. याच गाण्यांच्या जुगलबंदीमध्ये आज रविवारी आपल्याला झी मराठी वाहिनीवरील आपले लाडके कलाकार भेटणार आहेत.

'झिंग झिंग झिंगाट' या कार्यक्रमाचा आज २ तासांचा विशेष भाग प्रसारित होणार असून या भागात माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील अभिजित खांडकेकर, अनिता दाते, अद्वैत दादरकर, सुहिता थत्ते, कांचन गुप्ते, तुला पाहते रे या मालिकेतील अभिज्ञा भावे, मोहिनीराज गटणे, प्रथमेश देशपांडे, विद्या करंजीकर, शर्वरी पाटणकर आणि चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातील श्रेया बुगडे, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, तुषार देवल, स्नेहल शिदम हे कलाकार सहभागी होणार आहे.

आपल्या लाडक्या कलाकारांमध्ये रंगणारी गाण्याची मैफिल प्रेक्षक संध्याकाळी अनुभवू शकतील. आता हे सगळे कलाकार एकाच मंचावर आल्यावर गाण्यांसोबत धमाल मजा मस्ती तर होणारच यात शंका नाही. कोणाची सुरांशी किती मैत्री आहे हे जाणून घेण्यासाठी आज संध्याकाळी रंगणारा हा एपिसोड नक्की पाहा.

ABOUT THE AUTHOR

...view details