मुंबई - प्रत्येक कलाकाराला पुरस्कार प्रिय असतो. एखादा पुरस्कार मिळणे म्हणजे चांगल्या अभिनयाची दखल घेणे असते आणि चांगल्या कार्याची पावती असते. तसेच केलेल्या चांगल्या कामावर शिक्कामोर्तब असतो. चित्रपटांप्रमाणेच छोट्या पडद्यावरील कलाकारांचा सन्मान करण्यासाठी अनेक वाहिन्या पुरस्कार सोहळा भरवतात जेथे पुरस्कार देऊन कलाकारांचे कौतुक तर केले जाते. परंतु संपूर्ण वाहिनी परिवार एकत्र येऊन नात्यांचा एक उत्सव साजरा केला जातो. दरवर्षी झी मराठी वाहिनी सुद्धा ‘झी मराठी अवॉर्ड्स’ देत आपल्या कुटुंबातील कलाकारांचे कौतुक करत असते. याही वर्षी मराठी कलाकारांच्या मांदियाळीत झी मराठी अवॉर्ड २०२०-२१ मराठी कलाकारांच्या मांदियाळीत रंगला, 'उत्सव नात्यांचा, नव्या कथांचा' या टॅग-लाईनसह.
उत्साही वातावरणात रंगला ‘झी मराठी अवॉर्ड्स’ सोहळा - झीच्या रेड कार्पेटवर सेलिब्रिटीज
‘झी मराठी अवॉर्ड्स’ सोहळा दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी देखील अतिशय देखण्या आणि दिमाखदार पद्धतीने हा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. कलाकारांचे दिलखेचक परफॉरमन्स, विनोदी स्किटस् आणि कोणती मालिका जिंकते याची लागलेली उत्सुकता अशा वातावरणात हा कार्यक्रम रंगला.
‘झी मराठी अवॉर्ड्स’ सोहळा २०२१