महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

जम्मू काश्मीर प्रश्नावर दंगल गर्ल जायरा वासीमचे ट्विट व्हायरल.. - Jammu Kashmir issue

जम्मू काश्मीर प्रश्नावर दंगल चित्रपटातील अभिनेत्री जायरा वासिमने आपली प्रतिक्रिया ट्विटरवर दिली आहे. सध्या तिचे हे ट्विट व्हायरल झाले आहे.

जायरा वासीम

By

Published : Aug 5, 2019, 3:14 PM IST


मुंबई - दंगल गर्ल जायरा वासीमने सध्याच्या जम्मू काश्मिरमध्ये घडत असलेल्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर ट्विट केले आहे.तिचे हे ट्विट व्हायरल होत आहे.

सध्या संसदेत कलम ३७० हटवण्यासाठी चर्चा सुरू आहे. यामुळे देशभर एक वेगळेच वातावरण निर्माण झाले आहे. जायराने आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय की, 'काश्मिरचे हे दिवसदेखील जातील.'

जायराच्या या ट्विटवर अनेक लोक कॉमेंट्स करीत आहेत. जायराने जेव्हा सिनेक्षेत्र सोडण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा ती खूप चर्चेत आली होती. आता ती काश्मिर प्रश्नामुळे पुन्हा चर्चेत आली आहे.

३७० कलम रद्द करण्यावरुन सध्या संसदेत चर्चा सुरू असून जम्मू काश्मिरला असलेला विशेष दर्जा रद्द करण्यात आला आहे. जम्मू काश्मिर वेगळे केद्रशासीत प्रदेश झाला असून लडाखला वेगळे करुन त्याला केंद्रशासित प्रदेश घोषित करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details