महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

‘कोण होणार करोडपती' ला मिस्ड कॉल म्हणजे एक करोडचा कॉल! - सचिन खेडेकर करणार ‘कोण होणार करोडपती' चे सूत्रसंचालन

'कोण होणार करोडपती'या शोचा नवीन सिझन सोनी मराठी वाहिनीवर सुरू होणार आहे. याचे सूत्रसंचालन सचिन खेडेकर करणार आहेत. या शोमध्ये सहभागी होण्यासाठी केवळ मिस्ड कॉल देऊन तुमचे रजिस्ट्रेशन करु शकता किंवा सोनी लिव्ह ॲपवर जाऊन प्रेक्षक नोंदणी करू शकता आणि करोडपती बनण्याची संधी मिळवू शकतात.

Kon Hanar Karodpati
‘कोण होणार करोडपती

By

Published : Mar 24, 2021, 12:10 PM IST

‘कौन बनेगा करोडपती’ या प्रसिद्ध, ज्याचे सूत्रसंचालन बिग बी करतात, कार्यक्रमाचा मराठी अवतार म्हणजे ‘कोण होणार करोडपती’. २०१९ ला पहिला सिझन झाल्यावर गेल्यावर्षी कोरोनामुळे या कार्यक्रमाला विश्राम घ्यावा लागला होता. परंतु कोरोना परिसथिती थोडी स्थिरस्थावर झाल्यावर आता दुसरा सिझन येऊ घातलाय. पहिल्या भागाचे सूत्रसंचालन ‘सैराट’ फेम नागराज मंजुळे यांनी केले होते व आता दुसऱ्या भागासाठी जेष्ठ अभिनेते सचिन खेडेकर यांची वर्णी लागलीय. मराठी घराघरांत सगळ्यांना सचिन खेडेकर परिचित आहेत. पूर्वी ईटीव्ही मराठीवर सचिन खेडेकर यांनीच मराठी करोडपती शोची सुरुवात केली होती.

‘कौन बनेगा करोडपती’ चे सूत्रसंचालन करणार सचिन खेडेकर
महाराष्ट्र खऱ्या अर्थानं विद्येचं माहेरघर आहे. ज्ञान तुम्हांला यशाच्या शिखरावर पोचवू शकतं. 'कोण होणार करोडपती' हा कार्यक्रम महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात माहीत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या, मराठी मातीतल्या माणसांना हॉटसीटवर बसण्याची आणि करोडपती होण्याची संधी मिळणार आहे. मिस्ड कॉल म्हणजे एक करोडचा कॉल हा आता महाराष्ट्रासाठी मूलमंत्र झाला आहे. आता एक मिस्ड कॉल तुम्हांला करोडपती बनवू शकतो. एक मिस्ड कॉल देऊन तुम्ही ‘कोण होणार करोडपती’ मध्ये सहभागी होण्यासाठी रजिस्ट्रेशन करू शकता. २०२१ मध्ये सोनी मराठी वाहिनीवर 'कोण होणार करोडपती' सुरू होणार आहे. या वर्षी 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सचिन खेडेकर करणार आहेत. प्रेक्षकांना मोहित करून टाकणारा आवाज आणि समोरच्याशी संवाद साधण्याचं कसब हे खेडेकरांचे गुण आहेत आणि त्यामुळेच स्पर्धकांना आणि प्रेक्षकांना ते आपलेसे वाटतील यात शंका नाही. आपल्या देहबोलीमुळे आणि आवाजामुळे सचिन खेडेकर हे प्रेक्षकांचे लाडके अभिनेते आहेत. या कार्यक्रमात सामान्यजन स्पर्धक म्हणून हॉटसीटवर येतात. त्या प्रत्येकाला आपलंस करून त्यांच्याबरोबर हा सामान्य ज्ञानाचा खेळ खेळावा लागतो.'कोण होणार करोडपती' ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी २४ मार्चपासून नोंदणी सुरू होणार आहे. २४ मार्च ते २ एप्रिल यादरम्यान ८०८०० ४४ २२२ या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन किंवा सोनी लिव्ह ॲपवर जाऊन प्रेक्षक नोंदणी करू शकतात आणि करोडपती बनण्याची संधी मिळवू शकतात.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details