वाशिंग्टन (डीसी) -लोकप्रिय कार्टून शो असलेल्या 'योगी बीयर'ला आवाज देणाऱ्या सुप्रसिद्ध व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट जुली बेनेट यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. त्या 88 वर्षाच्या होत्या.
त्यांच्या जवळचे नातेवाईक स्कॉर्ग्ज यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
जुली बेनेट 'योगी बीयर' शो मधे 'सिंडी बीयर' या कार्टूनला आवाज देत होत्या.
'या' लोकप्रिय कार्टूनला आवाज देणाऱ्या कलाकाराचं कोरोना मुळे निधन मागच्या आठवड्यात जूली यांना कोरोनाचे निदान झाले होते. त्यांना लॉस एंजेलिस येथील सिडर्स सिनाई रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्या प्रकृतीत आणखी बिघाड झाल्याने त्यांचं निधन झालं.
त्यांनी 'स्पायडर मॅन'मध्ये देखील आवाज दिला आहे. तसचं 'गारफील्ड अँड फ्रेंड्स' मध्येही त्यांनी आपला आवाज दिला आहे.
त्यांच्या निधनामुळे हॉलिवूड मध्ये शोककळा पसरली आहे.