मुंबई: कोविड -१९ आणि न्यूमोनिया झाल्याचे निदान झालेली अभिनेत्री दिव्या भटनागरनचे आज पहाटे रुग्णालयात निधन झाले. तिने ३४ वर्षांची होती. कोविड -१९ची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर नोव्हेंबरमध्ये तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिची प्रकृती अधिकच खराब झाल्यावर गेल्या आठवड्यात तिला व्हेंटिलेटरच्या आधारावर ठेवण्यात आले होते. तिची प्रकृती गंभीर झाल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी चांगले उपचार मिळावे म्हणून तिला वेगळ्या रूग्णालयात हलवले होते.
नोव्हेंबरमध्ये दिव्याची आई आणि भाऊ तिची तब्येत बिघडल्याची माहिती मिळताच ते दिल्लीहून मुंबईला आले होते. अभिनेत्री दिव्याच्या आईने यापूर्वी एका अग्रगण्य वेबलोइडशी बोलताना सांगितले होते की, दिव्याचे लग्न गगन नावाच्या माणसाबरोबर झाले होते आणि त्यामुळे तिला खूप त्रास झाला होता.
हेही वाचा - ख्रिस्तोफर नोलन यांनी स्वतःच्या हस्ताक्षरातील डिंपल यांना लिहिलेली चिठ्ठी अक्षयने केली शेअर