गुवाहाटी - बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमला सध्या एका कारणामुळे सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. तिचा एक व्हिडिओ झपाट्याने व्हायरल झाला आहे. यामध्ये यामी चाहत्याचं आदरातिथ्य नाकारताना दिसते. तिच्या या वागणुकीमुळे नेटकऱ्यांनी तिच्यावर निशाणा साधला आहे. हा व्हिडिओ व्हायरल होत असल्यामुळे यामीने एका ट्विटद्वारे याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
अलीकडेच यामी आसामच्या गुवाहाटी विमानतळावर स्पॉट झाली होती. विमानतळावर तिला पाहण्यासाठी चाहत्यांनी बरीच गर्दी केली होती. तिच्या स्वागतासाठी आलेल्या एका चाहत्याने त्यांच्या पारंपरिक संस्कृतीप्रमाणे गमोसा घालून तिचे स्वागत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यामीने त्याला सरळ नकार दिला. तसेच, तिथून पुढे निघून गेली.