मुंबई - जेव्हा एखादा गुन्हेगार निष्पाप लोकांचे जीव धोक्यात घालतो तेव्हा एखादा गुरुवार घातवार ठरतो. काय होईल जर एखाद्या बालवाडी शिक्षिकेने अचानक बंदुक बाहेर काढली आणि तिथल्या मुलांना ओलीस ठेवले? बालवाडी शिक्षिका नयना जयस्वाल अचानक एके दिवशी तिच्या विद्यार्थ्यांना ओलीस ठेवते आणि लहान मुलांच्या हसण्याने आणि निरागसते भरलेल्या बालवाडीतील वातावरण एका थरारनाट्यात बदलून जाते. नयनाने एवढे कठोर पाऊल का उचलले असेल व तिचे अंतिम उद्दिष्ट काय असेल हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाईल की तिच्यावर कारवाई होईल हे 'अ थर्सडे’ मधून समोर येईल. 'अ थर्सडे’ मधून मानवी स्वभावाची काळी बाजू, घटनांची अनपेक्षित वळणे आणि गुप्त योजना उघड केल्या जातील.
'अ थर्सडे’ मध्ये यामी गौतम धर बालवाडी शिक्षिका नयना जयस्वाल च्या भूमिकेत दिसणार असून तिने पहिल्यांदाच अशा प्रकारची भूमिका साकारली आहे. यामी या चित्रपटात संपूर्णपणे नव्या अवतारात दिसणार आहे. मानवी स्वभावाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणारा हा चित्रपट प्रेक्षकांना अनपेक्षित ट्विस्ट्स आणि सस्पेंसफूल वळणावरून प्रवासाला घेऊन जाईल. ‘अ थर्सडे' ची गुंतागुंत आणि मंत्रमुग्ध करणारी कथा प्रेक्षकांना खिळवून ठेवेल.
डिज्नी+ हॉटस्टार वर ही सिरीज प्रदर्शित होणार असून नुकताच याचा ट्रेलर प्रदर्शित झाला. अनेक ब्लॉकबस्टर हिट्सनंतर, डिज्नी+ हॉटस्टार 'अ थर्सडे' सह पुन्हा एकदा प्रेक्षकांना रोमांचित करण्यासाठी सज्ज झाला आहे. सस्पेन्स आणि अनपेक्षित वळणांनी भरलेला, 'अ थर्सडे' शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. बेहजाद खंबाटा दिग्दर्शित, या चित्रपटात यामी गौतम धर आणि दिग्गज अभिनेत्री डिंपल कपाडिया, नेहा धुपिया, अतुल कुलकर्णी असे मातब्बर कलाकार दिसणार आहेत.
हेही वाचा -मी विचाराने आणि मनाने रणबीरसोबत आधीच लग्न केले आहे आलिया भट्ट