मुंबई - शहरातील एका रुग्णालयात अन्न मिळत नसल्याचे एका पटकथा लेखकाने दाखवून दिल्यानंतर महाराष्ट्राचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी यात लक्ष घालून हस्तक्षेप केला आहे. त्यामुळे आता रुग्णालयात जेवण पुरवठा सुरू झालाय.
पटकथा लेखक विशाल कपूर यांनी ट्विटरवर लिहून सांगितले होते, की मालाडमधील संजीवनी रुग्णालयात त्याचे काका कोव्हिड-१९ चा उपचार घेत असताना तिथे खायला अन्न मिळत नव्हते.
या ट्विटची तातडीने दखल घेत आदित्य ठाकरे यांनी शिवसेना नगरसेवक अमेय घोले यांना या प्रकरणात लक्ष घालण्याचा सल्ला दिला.
आदित्य ठाकरे यांनी अशा प्रकारे केलेल्या हस्तक्षेपामुळे संबंधित रुग्णालयाचे जवळच्या रेस्टॉरंट्समधून जेवण पुरवठा सुरू केला आहे, असे विशाल कपूर यांनी सांगितले. पटकथा लेखक विशाल यांनी लपाछपी हा मराठी हॉरर चित्रपट लिहिला होता. तसेच बॉम्बर्स ही टीव्ही मलिकाही लिहिली आहे.
रुग्णालयामध्ये अन्न पुरवठा करण्याच्या सेवेत अडचणी होत्या. त्यावर त्यांनी उपाय शोधला असल्याचे शिवसेना नगरसेवक अमेय घोले यांनी सांगितले.
पटकथा लेखक विशाल कपूर यांनी मदत झाल्याबद्दल आदित्य ठाकरे, अमेय घोले आणि सीएमओ महाराष्ट्र यांचे आभार मानले आहेत.