महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

सांगलीच्या रस्त्यावर अनोखे रक्षाबंधन, सैनिंकाचेही डोळे ओलावले - flood help

महापुरात मदतीसाठी आलेल्या सैनिकांचे महिलांनी राखी बांधून स्वागत केले. हा अनोखा सोहळा रस्त्यावरच पार पडला. सर्वत्र भारतीय सैनिकांच्या कामाचे कौतुक होत होते.

अनोखे रक्षाबंधन

By

Published : Aug 12, 2019, 1:11 PM IST

मुंबई - कोल्हापूर, सांगली आणि कराड परिसराला गेली काही दिवस महापुराचा वेढा पडलाय. यात लाखो लोक अडकले होते. स्थानिक कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करुन लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु जेव्हा भारतीय सैन्य मदतीला धावून आले तेव्हा खरा दिलासा मिळाला. गेली काही दिवस हे सैनिक अथकपणे लोकांना वाचवण्याचे प्रयत्न करीत आहेत.

भारतीय सैनिकांनी महापुरात अडकलेल्या लोकांची सुटका केल्यानंतर सांगलीतील महिलांनी अनोख्या प्रेमाचे दर्शन घडवले. सैनिकांच्या हातावर राख्या बांधून महिलांनी आपली कृतज्ञता व्यक्त केली आहे. हा व्हिडिओ रितेश देशमुख यांनी शेअर केला आहे.

रितेशने व्हिडिओ शेअर करीत कॅप्शनमध्ये लिहिलंय की ही आमची संस्कृती आहे. जय हिंद.

ABOUT THE AUTHOR

...view details