सुरुवातीपासूनच मराठी घरांमध्ये शिक्षणाला महत्व दिलं गेलं आहे म्हणूनच अनेक क्षेत्रात मराठी माणसं आघाडीवर दिसतात. शिक्षणाबरोबर येते ज्ञान आणि याच ज्ञानाचा उपयोग करून जिंकता येते मोठी रक्कम सोनी मराठीच्या ‘कोण होणार करोडपती’ च्या मंचावर. नुकतीच याची प्रचिती आली स्पर्धक मयूरी वावदाने हिला. तिने मोठी रक्कम जिंकत सर्वांची वाहवा तर मिळविलीच परंतु त्या रकमेने तिने आपल्या कुटुंबाला कर्जमुक्त केले.
‘कोण होणार करोडपती'मध्ये मयूरी वावदा माणूस कोणत्याही मोठ्या संकटात सापडला, तरी त्याचं ज्ञानच त्याला त्यातून बाहेर पडण्यासाठी मदत करू शकतं. ज्ञान तुम्हांला कधीही उपयोगी पडू शकतं आणि हीच तुमची खरी ताकद आहे. 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमात याच ज्ञानाच्या साथीने स्पर्धक एक करोड रुपये जिंकू शकतात. या आठवड्यात मुंबईची मयूरी वावदाने हॉट सीटवर खेळायला आली आहे. मयूरी एमबीबीएसची विद्यार्थिनी आहे.
‘कोण होणार करोडपती'मध्ये मयूरी वावदा सचिन खेडेकर हे उत्तम संचालक असून हॉट सीटवर असलेल्या सर्व स्पर्धकांना सांभाळून घेतात आणि त्यांना बोलतंही करतात. मयूरीला तिच्या स्वप्नाविषयी विचारलं असता कुटुंबावर असलेलं कर्ज फेडता यावं, असं ती म्हणाली. आपल्या ज्ञानाच्या जोरावर इथपर्यंत पोचलेली मयूरी तिच्या कुटुंबाला या खेळामुळे कर्जमुक्त करेल. मयूरीच्या आईचं स्वप्न होत हॉट सीटवर खेळायला यायचं, पण त्यांना ती संधी मिळाली नाही. हॉट सीटवर बसण्याची आणि कुटुंबावरचं कर्ज फेडण्याची संधी आता मयूरीला मिळाली आहे. मयुरीने अचूक उत्तरे देत कमाई करुन आपल्या घराला कर्जमुक्त केल्याचे उदाहरण 'कोण होणार करोडपती' या शोमध्ये पाहायला मिळाले.
'कोण होणार करोडपती' हा शो सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होत असतो.
हेही वाचा - पॉर्नोग्राफी प्रकरणामध्ये राज कुंद्राला जामीन फेटाळला