मुंबई- अभिनेत्री दिया मिर्झा म्हणाली की, बदल हे सहानुभूती, करुणा आणि इच्छाशक्तीच्या हेतूने प्रेरित असतात. दियाने वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, "मला एक गोष्ट मला समजली आहे की, आपण बदल घडवून आणण्यासाठी जास्त काही करण्याची गरज नाही. यासाठी फक्त सहानुभूती, करुणा आणि प्रारंभ करण्याच्या इच्छाशक्तीची गरज असते."
'भारत के महावीर' या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार्या दियाने पुढे सांगितले, "तुम्ही समाजाचा विचार करणाऱ्या चांगल्या व्यक्ती असाल तर, तुम्ही आपली कृती दयाळूपणे आणि सहिष्णूतेने कराल. आम्ही केवळ बसून गोष्टी घडताना पाहू शकत नाही. आम्हाला बदल घडवून आणावा लागेल. पाहूयात हे कसे घडू शकेल. "
हेही वाचा - २०२१च्या ऑस्करसाठी भारताकडून मल्याळम चित्रपट 'जल्लीकट्टू'ची निवड!