मुंबई- लोकप्रिय मालिका 'अग्गबाई सूनबाई', हे ‘अग्गबाई सासूबाई’ चे दुसरे पर्व असून सून असलेल्या सासूवर कथानक फिरत. प्रेक्षकांनी पहिल्या परावाप्रमाणेच या पर्वालाही चांगला प्रतिसाद दिलाय. पहिल्या पार्वतीला तेजश्री प्रधानच्या जागी उमा पेंढारकर सून साकारतेय आणि दोन्ही पर्वत सासू -सून साकारताहेत जेष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ. येत्या भागात सासू असलेली सून आसावरी द्विधा मनस्थितीत सापडलेली प्रेक्षकांना बघायला मिळेल. आजोबांच्या म्हणजेच तिच्या सासऱ्यांच्या हट्टापायी आपल्या तत्त्वांना मुरड घालेल का याचे उत्तर मालिका पाहूनच मिळेल.
हट्टी आजोबा की तत्ववादी सून, कोण घेईल नमतं ‘अग्गबाई सूनबाई' या मालिकेत! - आसावरी
लोकप्रिय मालिका 'अग्गबाई सूनबाई', हे ‘अग्गबाई सासूबाई’ चे दुसरे पर्व असून सून असलेल्या सासूवर कथानक फिरत. प्रेक्षकांनी पहिल्या परावाप्रमाणेच या पर्वालाही चांगला प्रतिसाद दिलाय. पहिल्या पार्वतीला तेजश्री प्रधानच्या जागी उमा पेंढारकर सून साकारतेय आणि दोन्ही पर्वत सासू -सून साकारताहेत जेष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ. येत्या भागात सासू असलेली सून आसावरी द्विधा मनस्थितीत सापडलेली प्रेक्षकांना बघायला मिळेल. आजोबांच्या म्हणजेच तिच्या सासऱ्यांच्या हट्टापायी आपल्या तत्त्वांना मुरड घालेल का याचे उत्तर मालिका पाहूनच मिळेल.
झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'अग्गबाई सूनबाई' मध्ये आता एक विलक्षण वळण आलं आहे. सोहम आणि सुझेनच्या अफेअरबद्दल आसावरीला कळल्यावर आसावरी त्या दोघांनाही घराबाहेर काढते, इतकंच नव्हे तर आसावरी त्या दोघांना ऑफिसमधून देखील काढून टाकते. इतकं होऊन सुद्धा सोहमला स्वतःची चूक कळत नाहीये. सोहम सुझेनच्या घरी राहायला गेल्यावर तिच्या घराची अवस्था बघून परत आपल्या घरी जायला पाहिजे असं ठरवतो. पण आसावरी त्याला घरात घेणं शक्य नाही म्हणून सोहम आता आजोबांच्या खांद्यावर बंदूक ठेवून डाव साधणार आहे.
आजोबा घरी येतात सोहम बद्दल विचारतात. घरतले सगळे खोटं कारण देतात की तो कामासाठी बाहेर गेला आहे. पण सोहमला आसावरीने घराबाहेर काढल्याचे आजोबांना ‘बबडू’ कडून कळतं आणि आजोबांना चक्कर येते. आजोबा आसावरीकडे सोहमला परत घरी आणायचा हट्ट करतात पण शुभ्राला न्याय मिळवून देण्यासाठी आसावरीने हे उचललेलं हे पाऊल आजोबांमुळे मागे घेण्यासाठी राजी नसते. हट्टी आजोबा की तत्ववादी सून, कोण घेईल नमतं ‘अग्गबाई सूनबाई' या मालिकेत हे प्रेक्षकांना लवकरच समजेल.