मुंबई - 'मानिके मगे हिथे' या गाण्याची क्रेझ रिलीज होऊन काही महिने उलटले तरी कमी होण्याची चिन्हे दिसत नाही. आता या गाण्याची शिल्पा शेट्टी दिवानी बनली आहे. शिल्पाने 'सुपर डान्सर 4' शोच्या सेटवर कोरिओग्राफर गीता कपूरसोबत एक रील बनवले आहे.
शनिवारी, शिल्पाने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला. यात ती सुपर डान्सर 4 च्या सेटवर दिसत आहे. बहुरंगी लेहेंगा घातलेली, शिल्पा व्हायरल श्रीलंकन गाण्यावर गीतासोबत डान्स करताना दिसत आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे, "यालाच आम्ही स्टुपेन्डो फॅन्टाबुलसली फँटा स्मॅगोरिकली मॅजिकल म्हणतो!"
शिल्पाच्या आधी, अमिताभ बच्चन, टायगर श्रॉफ, माधुरी दीक्षित, परिणीती चोप्रा, क्रिस्टल डिसूझा, रणविजय सिंह, नेहा कक्कर, यशराज मुखाते आणि इतर बऱ्याच सेलिब्रिटींपासून ते त्यांच्या सोशल मीडिया प्रोफाईलवर या गाण्याने धमाल केली आहे.
'मानिके मगे हिथे' हे गाणे योहानी दिलोका डी सिल्वा यांनी बनवले आहे. श्रीलंकन इंटरनेट सेन्सेशन असेली योहानी ही गीतकार, रॅपर, संगीत निर्माता, यूट्यूबर आणि व्यावसायिक महिला देखील आहे. रिलीज झाल्यापासून हे गाणे विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्रेंड करत आहे आणि भारतातील यूट्यूबवर 116 दशलक्षांहून अधिक व्ह्यूज मिळवले आहेत. 'मानिके मगे हिथे' या गाण्याला हिंदी, तामिळ, मल्याळम, बांगला आणि इतर भाषांमध्ये अनेक लोकप्रिय कलाकारांनी रुपांतर केले आहे.
हेही वाचा - राज्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे 22 ऑक्टोबरपासून सुरू होणार