मुंबई -लॉकडाऊनमध्ये लोकांनी अनेक देशी विदेशी चित्रपट पाहिले. चित्रपटगृहे बंद होती आणि घराबाहेर पडायला परवानगी नव्हती त्यामुळे ओटीटी वर अनेक चित्रपट पाहिले गेले. एखादा चित्रपट पाहावा की नाही, याचा अंदाज प्रेक्षक कसा बांधतात? साहजिकच चित्रपटातील कलाकार, दिग्दर्शक यांचा अनुभव बघून. चित्रपटाचे पोस्टर नेहमीच चित्रपटाची उत्सुकता वाढविणारे असावे असे जाणकार सांगतात.
व्हिजुयल प्रोमोशनसाठी ‘सिंगल -विंडो’, “आब्रा-का-डाब्रा”! - editor
ट्वेंटिफोरएटिवन पब्लिसिटी प्रा. लि. च्या माध्यमातून बॉलिवूड आणि एम-टाऊनच्या चित्रपटांची पोस्टरच्या माध्यमातून पहिली झलक दाखवणारे पब्लिसिटी डिझायनर सचिन गुरव आणि प्रिफेस स्टुडिओच्या माध्यमातून हिंदी, मराठी चित्रपटांच्या संकलनाचे काम पाहणारे फैसल महाडीक यांनी एकत्र येऊन 'आब्रा-का-डाब्रा' नावाची कंपनी सुरु केली आहे. दिग्दर्शकांना, निर्मात्यांना, तसेच नव निर्मात्यांना 'आब्रा-का-डाब्रा'चा नक्कीच फायदा होईल.
संकलनामध्ये १८-१९ वर्षांचा दांडगा अनुभव असणारे फैसल महाडीक आणि जवळपास १५० सिनेमाच्या वर पब्लिसिटी पोस्टर केलेलं डिझायनर सचिन गुरव सांगतात, "आब्रा-का-डाब्रा म्हणजेच मॅजिक! आज सोशल मीडियाच्या, ओटीटीच्या काळात एका क्लिक वर सिनेमाचा फर्स्ट लूक टीजर-ट्रेलर आणि पोस्टर जगाच्या कानाकोपऱ्यात बसलेल्या प्रेक्षकांना दिसतो, त्याच लूकवर ते या सिनेमाची दखल घेतात. सध्याचा कोरोना काळ बघता निर्मात्यांना, दिग्दर्शकांना आमच्या कंपनीद्वारे ट्रेलर्स-प्रोमोज्, (Visual Promotion) पोस्टर डिझाईन, सोशल मीडिया या तीनही महत्वाच्या विभागांचं काम एकत्र एका छत्राखाली मिळावं हाच आमचा उद्देश आहे.”