महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

कामाच्याठिकाणी महिलांना सोसाव्या लागणाऱ्या लैंगिक छळावर भाष्य करणारा ‘विकल्प’! - रॉयल स्टॅग बॅरल सिलेक्ट लार्ज शॉर्ट फिल्म्

रॉयल स्टॅग बॅरल सिलेक्ट लार्ज शॉर्ट फिल्म्सकडून ‘विकल्प’ हा लघुपट सादर झाला असून यात नेहा शर्मा आणि अंशुल चौहान यांनी काम केलंय. निर्माते आणि दिग्दर्शक, धीरज जिंदाल यांनी एका लहान शहरातील मुलीची गोष्ट, जिला आपल्या कामाच्या ठिकाणी अत्यंत धक्कादायक अनुभव येतो आणि तिचे भवितव्य निश्चित करणारा एक मोठा निर्णय घेणे तिला बंधनकारक ठरते याची कथा अत्यंत संयतपणे मांडली आहे.

‘विकल्प’ हा लघुपट सादर
‘विकल्प’ हा लघुपट सादर

By

Published : Aug 27, 2021, 9:08 PM IST

‘विकल्प’ हा एका तरुण मुलीचा, कामाठिकाणी सोसाव्या लागणाऱ्या लैंगिक छळाशी दिलेला महत्त्वाकांक्षा आणि स्वाभिमान यांच्यातील लढा आहे. हा लघुपट समाजातील अनेक कार्यालयात दिसून येणार समस्येवर घणाघाती टीका करत भाष्य करतो. रॉयल स्टॅग बॅरल सिलेक्ट लार्ज शॉर्ट फिल्म्सकडून ‘विकल्प’ सादर झाला असून यात नेहा शर्मा आणि अंशुल चौहान यांनी काम केलंय. निर्माते आणि दिग्दर्शक, धीरज जिंदाल यांनी एका लहान शहरातील मुलीची गोष्ट, जिला आपल्या कामाच्या ठिकाणी अत्यंत धक्कादायक अनुभव येतो आणि तिचे भवितव्य निश्चित करणारा एक मोठा निर्णय घेणे तिला बंधनकारक ठरते याची कथा अत्यंत संयतपणे मांडली आहे.

‘विकल्प’ ची कथा शिवानी नावाच्या एका लहान शहरातील मुलीच्या आयुष्याभोवती फिरते. ती आपल्या आईवडिलांसोबत खूप वाद घालून आपले भविष्य महानगरात शोधण्याचा निर्णय घेते. मात्र, कामाच्या ठिकाणी आलेल्या एका अनपेक्षित आणि धक्कादायक घटनेमुळे तिच्या आयुष्यात उलथापालथ होते. तिला स्वतःसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेणे गरजेचे आहे. तिला बदला घ्यायचा आहे, आपल्या कुटुंबाकडे परत जायचे आहे किंवा संपूर्ण घटनेकडे दुर्लक्ष करून तिने स्वतःसाठी कठोर परिश्रमातून उभे केलेले आयुष्य जगायचे आहे, याबाबत तिला कठोर निर्णय घ्यावा लागतो. तो काय असतो हे ‘विकल्प’ मधून अनुभवायला मिळते.

या चित्रपटाबाबत पुढे बोलताना दिग्दर्शक धीरज जिंदाल म्हणाले की, “ ही गोष्ट माझ्या दोन मैत्रिणींनी सांगितलेल्या अनुभवावरून आलेली आहे. त्यांनी याच परिस्थितीचा सामना केला आहे आणि मला खात्री आहे की, ही गोष्ट फक्त या दोघांचीच नाही तर अशा अनेक महिला आहेत, ज्यांना अशा प्रकारचे निर्णय घेणे भाग पडते आणि त्यांनी कोणताही निर्णय घेतला तरी अंतिमतः त्यांचे नुकसानच होते. महिला आपल्या यशात आणखी अडथळा निर्माण करणाऱ्या नकोशा आणि अस्वीकारार्ह वागणुकीबद्दल आवाज उठवत आहेत.

‘विकल्प’बाबत बोलताना नेहा शर्मा म्हणाली की, ”जगभरातील महिलांवर लिंगाधारित छळ आणि कार्यस्थळावरील हल्ल्यांमुळे प्रचंड मोठा प्रभाव पडला आहे. हे अधिकाधिक सामान्य होऊ लागल्याचे दिसू लागले आहे आणि यातील अनेक घटना नोंदवल्याही जात नाहीत. यातील अनेक महिलांसमोर चित्रपटातील शिवानीसारखीच द्विधा मनःस्थिती निर्माण होते. या घटनेची तक्रार नोंदवायची आणि आपली नोकरी जाण्याची भीती बाळगून त्रासदायक चौकशीला सामोरे जायचे की, गप्प बसून आपले आयुष्य आहे तसे सुरू ठेवायचे. महिलांना कधी-कधी या भावनेला सामोरे जावे लागते की त्यांच्या संपूर्ण आयुष्यातील काम आणि महत्त्वाकांक्षा दाव्यावर लागल्या आहेत आणि ही किंमत त्यांच्यासाठी खूप जास्त आहे. हा चित्रपट कार्यस्थळावरील होणाऱ्या मोठ्या प्रमाणावरील छळाचे उत्तम सादरीकरण आहे. या छळाबाबत बरेचदा तक्रार नोंदवली जात नाही. त्याचे मुख्य कारण अविश्वास, दोष किंवा सामाजिक किंवा व्यावसायिक बदला घेण्याची वृत्ती या गोष्टी आहेत. महिलेसाठी हा निर्णय अंतिमतः कधीच सोपा नसतो.”

जिंदाल पुढे म्हणाले की, “मला वाटते की, अद्यापही बरेच काही करणे गरजेचे आहे आणि बऱ्याच गोष्टी सांगितल्या जात नाहीत. बरेचदा या छळामुळे स्त्रियांमध्ये नैराश्य येते हे स्पष्ट झाले आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून मी हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की एखादी महिला अशा परिस्थितीत अडकली जिथे तिला काहीतरी असे निवडायचे आहे ज्यात तिचे फक्त नुकसानच होणार आहे तर तो महिलेचा दोष नाही. मला वाटतं की रॉयल स्टॅग बॅरल सिलेक्ट लार्ज शॉर्ट फिल्म्ससारख्या व्यासपीठांची गरज आहे, जिथे दिग्दर्शक आपली कलात्मकता दाखवू शकतील.”

ऑफिसेसमधील लैंगिक छळाच्या गंभीर समस्येला स्पर्श करणारी कथा या दिग्दर्शकांनी सादर केली असून त्यात नेहा शर्मा ने साकारलेल्या शिवानी ने सहन केलेल्या या त्रासाला प्रेक्षकांसमोर उत्तमरित्या प्रस्तुत केले आहे. तिच्या महत्त्वाकांक्षा आणि आकांक्षा तिच्या न्यायाविरूद्ध उभ्या राहिल्याचे त्यांनी दर्शविले आहे. अंशुल चौहानने उभा केलेला शिवानीचा मित्र तिच्या भूतकाळातील घटनांबाबत बोलतो आणि तिला योग्य तो निर्णय घेण्यास सांगतो, त्यामुळे तिचा संघर्ष वेगळं रूप घेतो. ‘विकल्प’ मध्ये शिवानी स्वतःच्या भविष्याबाबत निर्णय घेत असताना प्रेक्षकांनाही शिकवण नक्कीच मिळेल.

हेही वाचा - चित्रपटांमध्ये मुघलांना ‘व्हिलन’ दर्शवणे अयोग्य - दिग्दर्शक कबीर खान

ABOUT THE AUTHOR

...view details