मुंबई - कॉमेडियन कुणाल कामराने विमान प्रवासात अर्णब गोस्वामीला प्रश्न विचारत भंडावून सोडले होते. आपल्या स्टुडिओत आलेल्या पाहूण्यांना आक्रमकपणे प्रश्न विचारणारा, संतापणारा अर्णब कुणालच्या प्रश्नावर मौन बाळगून होता. कुणालने त्याला गप्प केल्याने अनेकांना त्याचे आश्चर्य वाटले. कुणालच्या या कृतीचे गली बॉय चित्रपटाचा अभिनेता विजय वर्माने कौतुक केले आहे. त्याने कॉमेडियन कुणाल कामराचे आभार मानले आहेत. छळ करणाऱ्या अर्णब गोस्वामीला गप्प केल्याबद्दल कुणालचे कौतुक विजयने केलंय.
विजयने इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये लिहिलंय, ''कुणाल कामरा, आर्णबच्या दुर्मिळ दृश्याची पर्वणी दिल्याबद्दल, तुला धन्यवाद. त्याच्यात तो बरळण्याऐवजी गप्प बसलेला पाहायला मिळाला.''