मुंबई -बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि कियारा आडवाणी यांच्या 'कबिर सिंग' चित्रपटाची तरुणाईवर चांगलीच भूरळ पडली आहे. अवघ्या पाचच दिवसात १०० कोटींचा गल्ला जमवणाऱ्या 'कबिर सिंग'ची वाटचाल आता २०० कोटीकडे सुरू झाली आहे. शाहिदचा अभिनय आणि कियाराच्या सहजसुंदर अदांची चाहत्यांवर छाप पडली आहे. एवढंच काय तर, 'अर्जुन रेड्डी' म्हणजे विजय देवरकोंडानेही कियाराचे कौतुक केले आहे. त्याने स्वत:च्या हाताने कियारासाठी एक संदेश लिहून तिला पाठवला आहे.
दिग्दर्शक संदीप वांगा यांनी 'अर्जुन रेड्डी' हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. 'कबिर सिंग' हा याच चित्रपटाचा रिमेक आहे. याही चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप वांगा यांनीच केले आहे. या चित्रपटात कियाराचा निरागसपणा आणि तिच्या सौंदर्यांचे सर्वांनी कौतुक केले आहे. प्रेक्षकही या चित्रपटावर भरभरुन प्रतिक्रिया देत आहेत.