मुंबई - दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा लवकरच बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेसोबत आगामी चित्रपट 'फायटर'मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अर्जुन हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. हा चित्रपट हिंदीसह तेलुगू आणि तमिळ भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे. अनन्या पांडेनंतर बॉलिवूडच्या आणखी दोन अभिनेत्रींसोबत भूमिका साकारण्याची इच्छा असल्याचे विजयने म्हटले आहे.
विजय देवरकोंडा दक्षिण सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता आहे. 'अर्जून रेड्डी', 'गीता गोविंदम', 'डियर कॉम्रेड' यांसारख्या चित्रपटातून त्याला मोठी लोकप्रियता मिळाली आहे. त्यामुळे त्याला हिंदी चित्रपटात पाहण्याची चाहत्यांना आतुरता आहे. अलिकडेच विजयने अनन्यासोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला आहे. तसेच बॉलिवूडमध्ये कियारा आडवाणी आणि जान्हवी कपूर यांच्यासोबतची भूमिका साकारण्याची इच्छा असल्याचे त्याने बोलून दाखवले आहे.
हेही वाचा -रणवीरच्या '८३' वरही कोरोनाचे सावट, प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली