मुंबई - कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवस लॉकडाऊनची घोषणा केलीय. अशावेळी ज्यांचे घर नाही अशा लोकांच्यावर बाका प्रसंग आलाय. भारतात इतरवेळी सर्व सुरळीत असताना कितीतरी लोक भुकबळी ठरतात.
कोरोना व्हायरस : विद्या बालनने गरीब-मजुरांसाठी केले आवाहन - विद्या बालनने गरीब-मजूरांसाठी केले आवाहन
भारत लॉकडाऊन झाल्यामुळे गरीब बेघरांची स्थिती कठिण झाली आहे. ते लोक भुकबळी ठरू नयेत यासाठी विद्या बालनने एक पाऊल उचलले आहे.
विद्या बालन
अशावेळी अभिनेत्री विद्या बालनने गरीब मजूरांसाठी आपला आवाज उठवला आहे. विद्याने आपल्या इन्स्टाग्रामवर रोटी बँकचा तपशील दिला आहे. फोन नंबरसह अकाउंटची माहितीही विद्याच्या या पोस्टवरुन तुम्ही घेऊ शकता.
आपण सर्व आता घरामध्ये आहोत. आपल्या रोजच्या खर्चातील काही भाग जरी वाचवला आणि ते जरी कोरोनाचा शिकार झालेले नसले तरीही काही भुकेल्यांचा जीव वाचवू शकतो. तुमचा सहभाग इतरांना प्रेरणा देईल आणि गरीब लोकांची मदतही होईल.