नवी दिल्ली - भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहलची होणारी पत्नी धनश्री वर्मा आजकाल तिच्या डान्समध्ये बिझी आहे. धनश्री वर्माने तिच्या इन्स्टाग्राम आणि यूट्यूब चॅनलवरून लग्नाचे खास डान्स व्हिडिओ शेअर केले आहेत, ज्यात तिची जबरदस्त आकर्षक शैली पाहण्यासारखी आहे.
धनश्री वर्माचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे, ज्यात ती लाल रंगाच्या लेहंगामध्ये जबरदस्त स्टाईलमध्ये थिरकताना दिसत आहे. या व्हिडिओमध्येही धनश्री वर्मा तिच्या आधीच्या दोन्ही व्हिडिओंप्रमाणे रणबीर कपूरच्या गाण्यातील 'क्यूटीपाई' वर नाचताना दिसत आहे.
धनश्री वर्मा हिने हा डान्स व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे, जो आतापर्यंत 2 लाखाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. व्हिडिओमध्ये धनश्री वर्मा तिच्या दोन सहकाऱ्यांसमवेत जबरदस्त शैलीत रणबीर कपूरच्या गाण्यावर डान्स करताना दिसली आहे. तिच्या या व्हिडिओला चाहत्यांचेही खूप प्रेम मिळत आहे.