कथालेखक, स्तंभलेखक, अभिनेते भालचंद्र सिताराम घाडीगावकर (Actor Bhalchandra Sitaram Ghadigaokar) यांच्या नावाचा पुरस्कार ‘अव्वल पुरस्कार' (Avval Puraskar) हा रंगकर्मींना देण्यात येतो. हे या पुरस्कार सोहळ्याचे तिसरे वर्ष असून यावर्षी हा पुरस्कार ज्येष्ठ रंगकर्मी उपेंद्र दाते (Upendra Date ) यांना प्रदान करण्यात येणार आहे. उपेंद्र दाते यांचे मराठी रंगभूमीवर विशेष योगदान असून त्यांच्या अविरत आणि अविश्रांत कार्याची दखल कलाश्रमने घेतली असून त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. कलाश्रम नेहमीच पडद्यामागील कलाकारांचे आणि रंगकर्मींचे कार्य समाजासमोर आणत असते आणि पात्र रंगकर्मींचा सन्मान करीत असते.
स्वातंत्र्यसैनिक डॉ. परशुराम पाटील कला केंद्राच्या अंतर्गत कलाश्रमच्या वतीने प्रतीवर्षी 'अव्वल पुरस्कार' देण्यात येतो. यंदा तो ज्येष्ठ रंगकर्मी उपेंद्र दाते यांना देण्यात येणार आहे. कथालेखक, स्तंभलेखक, अभिनेते भालचंद्र सिताराम घाडीगावकर यांच्या नावाचा हा पुरस्कार आहे. शिवाय लेखक, पत्रकार, नाट्य समिक्षक रमेश उदारे यांच्या स्मृतिदिनाचे निमित्त घेऊन 'कलाश्रम' या संस्थेने 'मौसम बदल दिया' या अभिनव स्पर्धेचे आयोजन केले आहे.