आपला देश संगीतप्रेमी आहे तसेच संगीत लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. संगीतामधून अनेक भावना व्यक्त होतात आणि संगीतामध्ये आपला मूड बदलण्याची क्षमता आहे. संगीताशिवाय जीवनाला काय अर्थ आहे, या प्रश्नाचा संबंध कोरोनासारख्या अवघड काळात अधिक उठून दिसला. एमटीव्ही हा भारताचा पहिल्या क्रमांकाचा ‘युथ एंटरटेन्मेंट ब्रॅण्ड‘ भारताचे सर्वात मोठे शैक्षणिक व्यासपीठ अनअकॅडमीच्या सहयोगाने एक नवीन शो येतोय, 'अनअकॅडमी अनवाइण्ड विथ एमटीव्ही'.
सोनू निगम, मोनाली ठाकूर, रोचक कोहली, असीस कौर, कैलाश खेर, बादशाह, दर्शन रावल, लकी अली, अर्जुन कानुंगो, बेनी दयाल, पापोन, अरमान मलिक- अमाल मल्लिक, हर्षदीप कौर, स्नेहा खानवलकर, आस्था गिल, रीत तलवार, लिजो आणि किंग यासारखे अत्यंत प्रतिभावान संगीतकार उपस्थित राहून या शोची शोभा द्विगुणित करणार आहेत. प्रत्येक एपिसोडमध्ये विविध संगीतशैलींना दर्शविण्यात येईल आणि ते सर्व त्यांच्या मधुर आवाजांसह संगीतप्रेमींना मंत्रमुग्ध करतील.
शोचा भाग असण्याबाबतचा आनंद व्यक्त करत संगीत उस्ताद सोनू निगम म्हणाला, ''मी या शोसाठी केलेली संकल्पना माझ्या स्वत:करिता अनपेक्षित व अद्वितीय आहे. सर्व परफॉर्मन्स माझ्यासाठी सर्वांगीण आहेत, जेथे प्रत्येक सादरीकरणामधून स्वत:ची अद्वितीय क्षमता दिसून येते. माझ्या मते, कला ही त्या विशिष्ट कलाकाराच्या आत्म्याचे प्रतिबिंब आहे. संगीत हे माझ्या या विश्वासाला दुजोरा देते. 'अनअकॅडमी अनवाइण्ड विथ एमटीव्ही' हा शो प्रत्येक कलाकाराची वैयक्तिक संगीत क्षमता व तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब आहे. माझ्यासाठी हा समाधानकारक अनुभव आहे.''
शांतचित्त संगीत ते उत्साही बीट्सपर्यंत 'अनअकॅडमी अनवाइण्ड विथ एमटीव्ही'मध्ये प्रत्येक संगीतप्रेमीसाठी पॉवर-पॅक लाइन-अप आहे. लकी अली यांचे सर्वोत्तम 'वर्ल्ड फ्यूजन' सादरीकरण तुमचे लक्ष वेधून घेईल, बादशाह यांची आस्था गिल व रीत तलवार यांच्यासोबतची ग्रूव्ही हिप हॉप लाइन-अप तुम्हाला थिरकण्यास भाग पाडेल. रोमांसप्रेमी दर्शन रावल यांच्या प्रेमळ 'लव्ह ट्रॅप' सादरीकरणासह घायाळ होतील आणि अर्जुन कानुंगो व बेनी दयाल अनुक्रमे 'फ्यूचर पॉप' व 'बॉली फंक' या त्यांच्या व्हर्जन्ससह मंत्रमुग्ध करतील.