महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

ज्येष्ठ संगीतकार खय्याम रुग्णालयात दाखल - पद्म भूषण

खय्याम यांनी 'कभी कभी', 'उमराव जान', 'त्रिशुल', 'नूरी' आणि 'शोला और शबनम' यांसारख्या चित्रपटांना दमदार संगीत दिले आहे.

ज्येष्ठ संगीतकार खय्याम रुग्णालयात दाखल

By

Published : Aug 9, 2019, 11:55 AM IST

मुंबई -ज्येष्ठ संगीतकार खय्याम यांना फुफ्फुसाच्या आजारामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या ते अतीदक्षता विभागामध्ये भरती आहेत.

खय्याम यांच्या जवळच्या नातेवाईकांनी त्यांच्या तब्ब्येतीची माहिती देताना सांगितले, की 'त्यांची तब्येत नाजुक आहे. मात्र, सध्या ते स्थिर आहेत. डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत. त्यांना डिस्चार्ज कधी मिळेल, याबाबत अद्याप काहीही सांगता येत नाही. मात्र, त्यांची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी, यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत'.

खय्याम यांनी 'कभी कभी', 'उमराव जान', 'त्रिशुल', 'नूरी' आणि 'शोला और शबनम' यांसारख्या चित्रपटांना दमदार संगीत दिले आहे.

त्यांना 'संगीत नाटक अकादमी अवार्ड' आणि २०११ साली 'पद्म भूषण' या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. याशिवाय त्यांनी ३ फिल्मफेअर अवार्ड्सही आपल्या नावी केले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details