मुंबई - अभिनेता वरुण धवन लवकरच त्याच्या आगामी 'कुली नंबर १' या चित्रपटाच्या रिमेकमधुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या सेटवरुन त्याने एक मेजशीर व्हिडिओ चाहत्यांसाठी शेअर केला आहे.
वरुणने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्याचे वेगवेगळे मजेशीर लूक पाहायला मिळतात. वेगवेगळे अॅप वापरुन त्याने हा धमाल व्हिडिओ तयार केला आहे.
हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसु आवरता येणार नाही.
'आयुष्य जास्त गंभीर घेऊ नका. कारण, ते जगण्याशिवाय दुसरा पर्याय नाही' हा अल्बर्ट हबर्ट यांचा विचार त्याने या व्हिडिओसोबत पोस्ट केला आहे.
'कुली नंबर १' चे दिग्दर्शन डेव्हिड धवन हे करणार आहेत. तर, वसू भगनानी हे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.
वरुण या चित्रपटासोबतच 'स्ट्रिट डान्सर्स' मध्येही झळकणार आहे.