मुंबई -अभिनेता वरुण धवन आणि श्रद्धा कपूर यांची मुख्य जोडी असलेला 'स्ट्रीट डान्सर' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या या चित्रपटाचे कलाकार चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. वरुण धवन नेहमी या चित्रपटाच्या सेटवरचे अपडेट्स चाहत्यांशी शेअर करत असतो. मात्र, आता या चित्रपटाच्या सेटवरुन एक असा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रेमो डिसूजा सर्वांना 'गेट आऊट' असे म्हणताना दिसत आहे.
'स्ट्रीट डान्सर'च्या सेटवर रेमोने म्हटले गेट आऊट, तर कलाकारांनी केला 'असा' गलका - social media
'रेमो डिसूजा' हा 'स्ट्रिट डान्सर' चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. हा चित्रपट 'एबीसीडी' चित्रपटाचाच तिसरा भाग आहे. या चित्रपटाचे शूटिंग आता अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे सेटवर मौजमजेचे वातावरण पाहायला मिळते. व्हा
'रेमो डिसूजा' हा 'स्ट्रिट डान्सर' चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. हा चित्रपट 'एबीसीडी' चित्रपटाचाच तिसरा भाग आहे. या चित्रपटाचे शूटिंग आता अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे सेटवर मौजमजेचे वातावरण पाहायला मिळते. व्हायरल झालेल्या या व्हिडिओत रेमो देखील गमतीने सर्वांना गेट आऊट म्हणतो. मात्र, त्याच्याभोवती सर्व कलाकारांचा घोळका जमा होतो आणि त्याला थांबण्याची विनंती करताना दिसतात.
वरुण धवननेही हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. 'जेव्हा तुम्हाला स्ट्रीट डान्सरचा सेट सोडायचा नसतो', असे कॅप्शन त्याने या व्हिडिओवर दिले आहे.
वरुण आणि श्रद्धा एबीसीडीच्या दुसऱ्या भागातही मुख्य भूमिकेत होते. आता 'स्ट्रीट डान्सर'मध्येही दोघांची केमेस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ८ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.