महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'या' चित्रपटाने बदलले वरुण धवनचे आयुष्य, शेअर केली पोस्ट - स्ट्रीट डान्सर्स

आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रानेही या चित्रपटातून पदार्पण केले होते. त्यांचा हा पहिला वहिला चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान हिट झाला होता. वरुणने या चित्रपटाचे पोस्टर शेअर करुन एक खास कॅप्शनही या फोटोवर दिले आहे.

'या' चित्रपटाने बदलले वरुण धवनचे आयुष्य, शेअर केली पोस्ट

By

Published : Aug 2, 2019, 5:24 PM IST

मुंबई -बॉलिवूड अभिनेता वरुण धवन याने बॉलिवूडमध्ये 'स्टूडंट ऑफ द ईयर' या चित्रपटातून पदार्पण केले होते. दिग्दर्शक करण जोहरच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रटाने बॉलिवूडला ३ नवे चेहरे दिले होते. या चित्रपटाला आज ७ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त वरुणने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर कली आहे.

आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रानेही या चित्रपटातून पदार्पण केले होते. त्यांचा हा पहिला वहिला चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान हिट झाला होता. वरुणने या चित्रपटाचे पोस्टर शेअर करुन एक खास कॅप्शनही या फोटोवर दिले आहे. 'या चित्रपटाने माझे आयुष्य बदलले', असे त्याने या पोस्टवर लिहिले आहे.

सध्या वरुण धवन त्याच्या आगामी 'स्ट्रीट डान्सर्स'ची तयारी करत आहे. चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत श्रद्धा कपूर झळकणार आहे. पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होईल.

ABOUT THE AUTHOR

...view details