मुंबई -अभिनेता वरुण धवन आणि सारा अली खानच्या आगामी 'कुली नंबर १'च्या शूटिंगला आजपासून (९ ऑगस्ट) सुरुवात झाली आहे. त्यासाठी दोघेही बँकॉकला रवाना झाले आहेत.
१९९५ साली गोविंदा आणि करिश्मा कपूर यांची मुख्य भूमिका असलेला 'कुली नंबर १' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. आता याच चित्रपटाचा रिमेक तयार करण्यात येणार आहे.
या चित्रपटाच्या रिमेकसाठी वरुण धवनचा खास लूकही तयार करण्यात येणार आहे. त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर बँकॉकला जाण्यापूर्वी एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला होता.