महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

वरुण धवन घेणार कंगनाशी 'पंगा', एकाच दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट - remo

डान्स कोरियोग्राफर तसेच दिग्दर्शक रेमो डिसुजा हे स्ट्रीट डान्सर या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. तर, ऐश्वर्या अय्यर तिवारी या 'पंगा' चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.

वरुण धवन, कंगनामध्ये होणार टक्कर, एकाच दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट

By

Published : May 28, 2019, 12:48 PM IST

मुंबई - अभिनेता वरुण धवन आणि कंगना रनौत या दोघांचेही आगामी चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहेत. वरुण धवनचा 'स्ट्रीट डान्सर' आणि कंगनाच्या 'पंगा' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर दोघांचेही चित्रपट एकमेकांना टक्कर देताना दिसणार आहेत.

डान्स कोरियोग्राफर तसेच दिग्दर्शक रेमो डिसुजा हे स्ट्रीट डान्सर या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. तर, ऐश्वर्या अय्यर तिवारी या 'पंगा' चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. 'स्ट्रीट डान्सर' सुरुवातीला ८ नोव्हेंबर २०१९ रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र, नंतर त्याच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली.

आता हा चित्रपट २४ जानेवारी २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे. नेमका याच दिवशी कंगनाचा 'पंगा' चित्रपट देखील प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे आता दोनपैकी कोणत्या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो, हे पाहणे महत्वाचे ठरेल.

'पंगा' हा चित्रपट कबड्डी खेळावर आधारित आहे. कंगना या चित्रपटात कबड्डी खेळाडूच्या भूमिकेत दिसणार आहे. तर तिच्यासोबत अभिनेता राजकुमार राव हा देखील मुख्य भूमिका साकारणार आहे. वरुण धवनच्या 'स्ट्रीट डान्सर'मध्ये त्याच्यासोबत श्रद्धा कपूर आणि नोरा फतेही झळकणार आहेत. तसेच, डान्स इंडिया डान्स मधील माजी स्पर्धक देखील यामध्ये महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details