महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'कपिल शर्मा शो'मध्ये वरुण आणि साराने केले 'कुली नंबर 1'चे प्रमोशन - Actor Varun Dhawan

'कुली नंबर 1' हा चित्रपट अमेझॉन प्राइम व्हिडीओवर रिलीज होणार आहे. या विनोदी चित्रपटात वरुण धवन आणि सारा अली खानमध्ये खूप मजेदार स्टाईलमध्ये पाहायला मिळतील. याच्या प्रमोशनासाठी वरुण आणि सारा कपिल शर्मा शोमध्ये पोहोचले होते.

Varun and Sara
वरुण आणि सारा

By

Published : Oct 27, 2020, 1:19 PM IST

मुंबई- अभिनेता वरुण धवन आणि सारा अली खानचा 'कुली नंबर 1' हा चित्रपट अमेझॉन प्राइम व्हिडिओवर रिलीज होणार आहे. या विनोदी चित्रपटात वरुण धवन आणि सारा अली खानमध्ये खूप मजेदार स्टाईलमध्ये पाहायला मिळतील. ख्रिसमसच्या निमित्ताने अमेझॉन प्राइम व्हिडिओवर 'कुली नंबर 1' चा प्रीमियर होईल. पण वरुण धवन आणि सारा अली खान आधीपासूनच चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र असून कपिल शर्माच्या शोमधून चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत.

'कुली नं. १' हा फॅमिली कॉमेडी चित्रपट डेव्हिड धवन दिग्दर्शित आहे. या चित्रपटात वरुण धवन सारा अली खान, परेश रावल, जावेद जाफरी, जॉनी लीव्हर, राजपाल यादव यांच्यासह अन्य कलाकारांच्या भूमिका आहेत. वासु भगनानी, जॅकी भगनानी आणि दीपशिखा देशमुख यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट 25 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.

हा चित्रपट सर्वप्रथम चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता, परंतु कोरोना विषाणूच्या साथीमुळे प्रेक्षकांना चित्रपटगृहांमध्ये पोहोचण्यास अद्याप वेळ लागेल. म्हणूनच ओटोटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details