मुंबई -मराठीमध्ये ‘कॉफी आणि बरंच काही’ म्हणत हिंदीत ‘बाजीराव मस्तानी’ मधून चिमाजी अप्पा साकारणारा अभिनेता वैभव तत्ववादी अनेकांचा आवडता कलाकार आहे. वैभव तत्त्ववादी हा मराठी चित्रपटातील लोकप्रिय कलाकार असून तो बॉलीवूडमध्येही तितकाच ओळखीचा चेहरा आहे. आता तो तिसऱ्या पडद्यावर म्हणजेच ओटीटी माध्यमावरदेखील पदार्पण करत आहे. सोनी लिव्हच्या ‘प्रोजेक्ट ९१९१'मध्ये वैभव प्रमुख भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीली येत आहे.
'प्रोजेक्ट ९१९१'मध्ये वैभव पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. वैभव साकारत असलेली पंकज ही व्यक्तिरेखा 'प्रोजेक्ट ९१९१'च्या प्रमुख टीमच्या सदस्यापैकी एक आहे. सोबत डीसीपी अमिताभ सिन्हा (सत्यजीत शर्मा) हेही दिसतील. तो एक साधा माणूस वाटत असला तरी अत्यंत बुद्धिमान, प्रॅक्टिकल आहे. आपल्या हजरजबाबीपणामुळे टीममध्ये तो धमाल करतो. आश्चर्यकारक अॅक्शन आणि विविध प्रकारच्या व्यक्तिरेखांनी सजलेली 'प्रोजेक्ट ९१९१' गुन्ह्यांचा शोध घेते आणि ते घडण्यापूर्वी थांबवते.
वैभव तत्त्ववादीचा ‘प्रोजेक्ट ९१९१’! - वैभव तत्त्ववादी प्रोजेक्ट ९१९१ मालिका
सध्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सला सुगीचे दिवस आले आहेत. अनेक दर्जेदार चित्रपट आणि मालिका याठिकाणी पहायला मिळतात. मराठमोळा कलाकार वैभव तत्त्ववादी देखील एका मालिकेच्या माध्यमातून ओटीटीवर पदार्पण करण्यास सज्ज झाला आहे.
वैभव तत्त्ववादी
हेही वाचा -राजा राणी खेळणार पहिली होळी