महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

ह्रतिक, रणबीर,अक्षयसोबत काम करणे हे वाणी कपूरसाठी स्वप्न सत्यात उतरल्यासारखे - वाणी कपूर 'शमशेरा'मध्ये रणबीरसोबत

वाणी कपूरला इतका आनंद झालाय की तिला आभाळ ठेंगणे वाटू लागलंय. हृतिक रोशन, रणबीर कपूर आणि अक्षय कुमार यांच्यासह स्क्रीन स्पेस शेअर करण्यासाठी वाणी पूर्णपणे उत्सुक आहे.

Vaani
वाणी कपूर

By

Published : Jul 21, 2020, 4:09 PM IST

मुंबईः अभिनेत्री वाणी कपूरला हर्ष आहे की तिला हृतिक रोशन, रणबीर कपूर आणि अक्षय कुमार यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. ती म्हणते की हे एक स्वप्न सत्यात उतरले आहे.

हृतिकबरोबर वाणीची 'वॉर' चित्रपटात जोडी बनली होती, तर ती 'शमशेरा'मध्ये रणबीरसोबत काम करीत होती आणि आगामी 'बेल बॉटम'मध्ये तिला अक्षयसोबत भूमिका साकारायला मिळत आहे.

"मला एकदम उत्साही वाटतंय आणि मला इंडस्ट्रीत अशा दिग्गजांसोबत काम करायला मिळाल्याचा आनंद आहे. मी नेहमी हृतिक, रणबीर आणि अक्षय कुमार यांना आयडॉल समजत आले आहे. मला त्यांचे चित्रपट आवडले आहेत म्हणून हे माझ्यासाठी स्वप्न पूर्ण होण्यासारखे आहे.", असे वाणी म्हणाली.

हेही वाचा - सुशांत सिंग आत्महत्या प्रकरण : चित्रपट समीक्षक राजीव मसंद पोलीस चौकशीसाठी हजर

या कलाकारांच्या वेगवेगळ्या अभिनय शैलींबद्दल बोलताना वाणी म्हणाली, "ह्रतिक हा अतुल्य प्रतिभा आणि कामाप्रती उत्कट असेलेला व्यक्ती आहे जो त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या सर्वांच्यावर प्रभाव टाकतो. रणबीर हा आपल्या वागण्यात आणि शांततेत राहण्यात सहज वाटत असला तरी त्याचा पडद्यावरील करिश्मा अद्वितीय असतो. अक्षय, अर्थात एक आयडॉल आहे आणि तो इंडस्ट्रीतील सर्वोत्कृष्ट कलाकार आहे. त्याच्या योगदानाकडे आणि त्याचा स्टार प्रेझेन्स याकडे कोणीही दुर्लक्ष करु शकत नाही."

या प्रत्येक तार्‍यांसोबत तिच्याकडे काही रंजक आणि वेगळी केमिस्ट्री असल्याचे वाणी म्हणाली. "या सर्वांशी माझे वेगळे समीकरण आहे आणि आमची केमिस्ट्री देखील वेगवेगळ्या भूमिकांमुळे वेगळी आहे. त्या सर्वांनी माझ्यात अधिक चांगले काम करण्याची इच्छा निर्माण केली आहे, आणि प्रयत्नपूर्वक माझ्याशी जुळवून घेतले आहे," असे ती म्हणाली.

ABOUT THE AUTHOR

...view details