महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

चार्ली चॅप्लिनच्या जन्मदिनी संदिप पाठकचे अनोखे फोटोशूट - चार्ली चॅप्लिनचा १३२ वा जन्मदिन

आज चार्ली चॅप्लिनचा १३२ वा जन्मदिन आहे. यानिमित्ताने संदिप पाठकने खास चॅप्लिन स्टाईल फोटो शूट करुन त्यांचे स्मरण केले आहे.

Unique photoshoot of Sandeep Pathak
संदिप पाठकचे अनोखे फोटोशूट

By

Published : Apr 16, 2021, 7:44 PM IST

एक हरहुन्नरी अभिनेता म्हणून संदिप पाठक सर्वांनाच परिचीत आहे. मालिका, चित्रपट आणि रंगभूमीच्या माध्यमातून तो अभिनयाच्या प्रवासाला निघालाय. विनोदी कलावंत अशीही त्याची ओळख आहे. पण गंभीर भूमिकाही तो लीलया पेलताना प्रेक्षकांनी पाहिलंय. तो आपल्या अभिनयाचा आदर्श जगविख्यात अभिनेता चार्ली चॅप्लिनला मानतो.

संदिप पाठकचे अनोखे फोटोशूट

आज चार्ली चॅप्लिनचा १३२ वा जन्मदिन आहे. यानिमित्ताने संदिपने खास चॅप्लिन स्टाईल फोटो शूट करुन त्यांचे स्मरण केले आहे.

संदिप पाठकचे अनोखे फोटोशूट

संदिपने लिहिलंय, ''आज माझ्या देवाचा म्हणजेच विश्वविख्यात "चार्ली चॅप्लीन" ❤️ चा जन्मदिवस. आभाळाएवढ्या या कलावंताची नक्कल, अनुकरण करण्याचा मोह कोणाला होणार नाही. 'सगळ्यांनाच' त्याच्या श्टाईलने फोटोशूट करूया आणि त्याला आजच्या दिवशी अभिवादन करूया हा एक छोटा कलाकार म्हणून माझा प्रयत्न. गोड मानून घ्या 😊'' , असे संदिपने म्हटले आहे.

संदिप पाठकचे अनोखे फोटोशूट

चार्ली चॅप्लीन म्हणतो की " माझं आयुष्यच नाट्यमय आहे. तेव्हा माझ्या आयुष्याचा प्रभाव माझ्या चित्रपटांवर पडणारच. त्यातील सारं वास्तव मी स्वत:च अनुभवल्यामुळे माझे चित्रपट जिवंत वाटतात.नकळत मी लोकांना जीवनातलं दु:ख दाखवून देतो.' तर असा हा हसऱ्या मुखवट्यातून वेदनेचा सूक्ष्म वेध घेणारा महान कलावंत. या "मनस्वी"कलावंताला अभिवादन 🙏 " असेही संदिपने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

संदिप पाठकचे अनोखे फोटोशूट

संदिप पाठकच्या या फोटोशूटवर चाहते खूश झाल आहेत. अनेकांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा - मनोरंजनसृष्टीला अत्यावश्यक सेवा म्हणून मानले जावे; IFTPC ची मागणी!

ABOUT THE AUTHOR

...view details