सोनी मराठीवर सुरु असलेली ‘अजूनही बरसात आहे' ही मालिका प्रेक्षकांना आवडत आहे. तब्बल आठ वर्षांनंतर एकत्र आलेले उमेश कामत आणि मुक्ता बर्वे प्रेक्षकांची मने जिंकताहेत. हीच मुक्ता आणि उमेश ची टीम सोनी मराठीवर सुरु असलेल्या 'कोण होणार करोडपती', च्या विशेष भागात हजेरी लावणार आहेत, प्रेक्षकांचा लाडका खेळ खेळणार आहेत. येत्या ४ सप्टेंबर, शनिवार, रात्री ९ वा. तो भाग प्रदर्शित होणार आहे.
प्रेक्षकांचे लाडके कलाकार उमेश कामत आणि मुक्ता बर्वे 'कोण होणार करोडपती' च्या विशेष भागामध्ये उपेक्षित महिलांचा 'आधारवड' असलेल्या 'माउली सेवा प्रतिष्ठान' या संस्थेच्या मदतीसाठी ज्ञानाचा हा खेळ खेळणार आहेत. समाजानी, आप्तस्वकीयांनी नाकारलेल्या आया-बहिणीचं मनगाव हे कायमस्वरूपी घरटं आहे. आपलं समाजाप्रती असलेलं कर्तव्य जाणून मुक्ता आणि उमेश हे दोघे या संस्थेसाठी 'कोण होणार करोडपती'च्या हॉटसीटवर आले आहेत.