Udit Narayan in Indian Idol : प्लेबॅक सिंगर उदित नारायण येणार ‘इंडियन आयडल मराठी' च्या मंचावर - udit narayan in indian idol marathi
‘इंडियन आयडल मराठी' महाराष्ट्राला टॉप ७ स्पर्धक मिळाले असून अंतिम फेरीसाठी आता सुरांची स्पर्धा बघायला मिळेल. यात प्लेबॅक सिंगर उदित नारायण ( Udit Narayan in Indian Idol ) येणार आहेत.
मुंबई -सोनी मराठी वाहिनीवरील ‘इंडियन आयडल मराठी’ हा सांगीतिक रियालिटी शो प्रेक्षकांच्या लाडका शो आहे. यात तरुण गायक गायिकांनी मराठी संगीतप्रेमींच्या मनात घर केले आहे. या कार्यक्रमातल्या प्रत्येक स्पर्धकाने पहिल्या भागापासून प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे. दिवसेंदिवस स्पर्धा रंगात चालली असून लवकरच पहिल्या पर्वाचा विजेता मिळणार आहे. महाराष्ट्राला टॉप ७ स्पर्धक मिळाले असून अंतिम फेरीसाठी आता सुरांची स्पर्धा बघायला मिळेल. ‘इंडियन आयडल मराठी' चा आगामी भागात सुरांच्या मंचावर सुरांसोबत आठवणींचा पेटाराही उघडला जाणार आहे. या भागात सुरेल गाणी स्पर्धक सादर करणार आहेत.
यंदाचा आठवडा ‘इंडियन आयडल मराठी’ च्या स्पर्धकांसाठी आणि प्रेक्षकांसाठीही खास असणार आहे कारण सुरांच्या मंचावर येणार आहे, हिंदी चित्रपटसृष्टीतील अतिशय प्रसिद्ध गायकांपैकी एक लोकप्रिय पार्श्वगायक उदित नारायण. उदित नारायण यांनी अनेक हिंदी चित्रपटांतील गाण्यांना आवाज दिला आहे. सुरांच्या मंचावर उदितजी यांनी खास संगीतप्रेमींसाठी त्यांची काही लोकप्रिय गाणी सादर केली आणि मंच सुरमय होऊन गेला. उदितजी यांनी अजय - अतूल यांच्यासोबत सुद्धा काम केलं असल्याने, किस्से, आठवणी या सगळ्यामुळे भाग चांगलाच रंगला.
हेही वाचा -अक्षय कुमारच्या 'बच्चन पांडे'चा बॉक्स ऑफिसवर दणका, पहिल्याच दिवशी केली १३ कोटींची कमाई